मुंबई – गेल्या दहा वर्षांत महाराष्ट्रात उष्माघातामुळे ८६७ जणांचा मृत्यू झाला आहे. उष्माघातामुळे होणाऱ्या मृत्यूंमध्ये महाराष्ट्राचा देशात सहावा क्रमांक लागत असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे. केंद्रीय भूविज्ञान मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, देशात गेल्या दहा वर्षांत उष्माघाताचा सर्वाधिक फटका उत्तर प्रदेश, बिहार, आंध्र प्रदेश, तेलंगण, पंजाब आणि महाराष्ट्र या राज्यांना बसला आहे. या कालावधीत या राज्यांमध्ये सात हजार ६९५ जणांचा उष्माघाताने मृत्यू झाला.उष्माघाताचे सर्वाधिक रुग्ण ग्रामीण भागात आढळतात. महाराष्ट्रात गेल्या दोन वर्षांत उष्माघाताने होणार्या मृत्यूंची संख्या लक्षणीय घटली आहे.२०२३ मध्ये नवी मुंबईत १२ तर २०२४ मध्ये बुलडाण्यात एकाचा मृत्यू झाला होता.
+29
°
C
H: +29°
L: +24°
Mumbai
Sunday, 26 March
See 7-Day Forecast
Mon | Tue | Wed | Thu | Fri | Sat |
+28° | +29° | +29° | +28° | +28° | +28° |
+24° | +25° | +25° | +26° | +26° | +25° |