तासगाव- गेल्या वर्षभरात विटा- म्हैसाळ रस्त्यावर मोठे खड्डे पडून रस्त्याची अक्षरशः चाळण झाली आहे.त्यामुळे येत्या दहा दिवसांत या ६५ किलोमीटरच्या रस्त्यातील खड्डे न बुजविल्यास कार्यकारी अभियंता श्रीधर घाडगे यांचे नाव देण्यात येईल असा इशारा दलित महासंघ (मोहिते गट) जिल्हाध्यक्ष प्रशांत केदार यांनी घाडगे यांना एका निवेदनाद्वारे दिला आहे.
प्रशांत केदार यांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे की, विटा- तासगाव- म्हैसाळ या ६५ किलोमीटरच्या रस्त्यात मोठे खड्डे पडले आहेत.हे खड्डे भरण्यासाठी २ कोटी ९३ लाख ४ हजार ७२० रुपयांचे कंत्राट दादासाहेब गुंजाटे कंपनीला देण्यात आला आहे.मात्र या ठेकेदाराने जाणीवपूर्वक कामाला विलंब लावत निकृष्ट दर्जाचे काम केले आहे.त्यामुळेच ही रस्त्याची अक्षरशः चाळण झाली आहे. हे खड्डे तातडीने भरून घ्यावेत.त्याची पूर्तता येत्या १० दिवसांत झाली नाही तर या रस्त्याला संबंधित कार्यकारी अभियंत्यांचे नाव दिले जाईल.