Home / News / १०४ वर्षे वयाच्या कैद्याची ३६ वर्षांनी तुरुंगातून सुटका

१०४ वर्षे वयाच्या कैद्याची ३६ वर्षांनी तुरुंगातून सुटका

कोलकाता- पश्चिम बंगालमधील मालदा जिल्ह्यात सख्ख्या भावाची हत्या करणाऱ्या एका आरोपीला जन्मठेपेची शिक्षा झाली होती. या कैद्याची आता तब्बल ३६...

By: E-Paper Navakal

कोलकाता- पश्चिम बंगालमधील मालदा जिल्ह्यात सख्ख्या भावाची हत्या करणाऱ्या एका आरोपीला जन्मठेपेची शिक्षा झाली होती. या कैद्याची आता तब्बल ३६ वर्षांच्या तुरुंगवासानंतर वयाच्या १०४ व्या वर्षी तुरुंगातून सुटका झाली आहे. रसिकत चंद्र मोंडल असे या सुटका झालेल्या कैद्याचे नाव आहे. मालदा जिल्ह्यातील पश्चिम नारायणपूर गावातील रसिकतवर मालमत्तेच्या वादातून आपल्या भावाची हत्या केल्याचा आरोप होता. १९८८ मध्ये वयाच्या ६८ व्या वर्षी त्याला अटक करण्यात आली. १९९२ मध्ये मालदा जिल्हा सत्र न्यायालयाने त्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावली. त्यानंतर २०१८ मध्ये त्याने कोलकाता उच्च न्यायालयात शिक्षेविरुद्ध अपील केले. परंतु ते फेटाळण्यात आले. त्यानंतर त्याने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. तिथेही त्याच्या विरोधात निकाल देण्यात आला. २०२० मध्ये वयाच्या ९९ व्या वर्षी त्याने वय आणि आरोग्याच्या कारणास्तव पुन्हा एकदा सर्वोच्च न्यायालयात सुटकेसाठी अपील केले. न्यायालयाने पश्चिम बंगाल सरकारला त्यांच्या आरोग्याचा अहवाल सादर करण्यास सांगितले. सरकारने आरोग्य चांगले असल्याचा अहवाल दिला. मात्र, तुरुंगात असताना त्याचे वर्तन चांगले असल्याच्या कारणास्तव सर्वोच्च न्यायालयाने त्याची सुटका करण्याचे आदेश दिले. आता तुरुंगातून बाहेर पडलेले १०८ वर्षांचे रसिकत यांना आपण तुरुंगात किती वर्षे घालवली हेसुद्धा आठवत नाही.

Web Title:
संबंधित बातम्या