१,००० कोटींच्या घोटाळ्यासंदर्भातअभिनेता गोविंदाची चौकशी होणार

मुंबई :

एक हजार कोटी रुपयांच्या ऑनलाइन पाँझी घोटाळ्यासंदर्भात ओडिशाच्या आर्थिक गुन्हे शाखेचे अधिकारी लवकरच माजी खासदार सिनेअभिनेता गोविंदाची चौकशी करणार आहेत. सोलार टेक्नो अलायन्सने अनेक देशांमध्ये क्रिप्टो गुंतवणुकीच्या नावाखाली बेकायदेशीर ऑनलाइन पाँझी योजना चालवली. या कंपनीला गोविंदाने शिफारस आणि पाठिंबा दिल्याचा आरोप आहे.

या घोटाळ्यात दोन लाखांहून अधिक लोकांची फसवणूक झाली आहे. या ऑनलाइन पॉन्झी योजनेअंतर्गत रिझर्व्ह बँक इंडियाकडून कोणत्याही अधिकृत परवानगीशिवाय देशातील दोन लाखांहून अधिक लोकांकडून एक हजार कोटी रुपये गोळा करण्यात आले, असे ओडिशा आर्थिक गुन्हे शाखेने म्हटले आहे. या कंपनीच्या विविध प्रमोशनल व्हिडिओंमध्ये अभिनेता गोविंदा यांनी त्यांची प्रसिद्धी केली होती. म्हणूनच या प्रकरणात अधिक माहिती मिळवण्यासाठी गोविंदाची चौकशी होणार आहे.

“आम्ही गोविंदाच्या चौकशीसाठी लवकरच मुंबईला एक टीम पाठवू. त्याने जुलै महिन्यात गोव्यात पार पडलेल्या या कंपनीच्या कार्यक्रमाला हजेरी लावली होती. त्याचप्रमाणे काही व्हिडीओंतून त्यांनी कंपनीची प्रसिद्धी केली होती. सध्या तरी गोविंदा याप्रकरणी संशियत किंवा आरोपी नाहीत. त्याची नेमकी भूमिका काय होती, हे चौकशीनंतरच स्पष्ट होऊ शकेल. त्याची भूमिका फक्त प्रसिद्धी आणि जाहिरातीसाठीच मर्यादित होती असे निष्पन्न झाल्यास आम्ही त्याला या प्रकरणात साक्षीदार बनवू,” असे आर्थिक गुन्हे शाखेचे इन्स्पेक्टर जनरल जे. एन. पंकज यांनी सांगितले.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top