परभणी- जिल्ह्यातील प्रसिद्ध हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांनी राज्यभरात सलग पावसाळ्यासारखा पाऊस कोसळणार असल्याचा अंदाज वर्तविला आहे.डख यांच्या हवामान अंदाजानुसार,येत्या २४ एप्रिलपासून २ मे पर्यत सलग दहा दिवस पावसाळ्यासारखा पाऊस कोसळण्याची शक्यता आहे. यावेळी विजांचा कडकडाट आणि गारांचा पाऊस पडणार आहे.त्यामुळे हा अंदाज घेऊन शेतीची कामे उरकून घ्यावीत असे आवाहन केले आहे.
त्याचप्रमाणे पूर्व विदर्भात उद्यापासून २९ एप्रिलपर्यंत तुरळक भागात कुठे वारा तर कुठे गारपीट होण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा आणि दक्षिण-पश्चिम महाराष्ट्रात उद्यापासून ३० मे पर्यंत विदर्भासारखीच परिस्थिती राहणार आहे. दहा दिवसांतील पावसाच्या अंदाजामुळे शेतकऱ्यांनी आपली पाळीव जनावरे आणि हळद पिकांसारख्या पिकांची काळजी घ्यावी, तसेच या काळात भाग बदलत २ मे पर्यंत पाऊस कोसळण्याची शक्यता आहे असे पंजाबराव डख यांनी म्हटले आहे.