ह.भ.प केशव महाराज जाधव
यांचा कारच्या धडकेत मृत्यू

नाशिक

नाशिकच्या नांदगाव-येवला येथे भीषण अपघात झाला. येथील बेलदारवाडी शेतातून पायी जाणाऱ्या दोघांना ओमनी गाडीने मागून धडक दिली. या भीषण अपघातात नाशिकमधील प्रसिद्ध गायनाचार्य ह.भ.प. केशव महाराज जाधव यांचा जागीच मृत्यू झाला. तर त्यांच्या सोबत असणारा एकजण गंभीर जखमी झाला.

नाशिकच्या नांदगाव-येवला रस्त्यावरील बेलदारवाडीजवळ हा अपघात झाला. येथून जाणाऱ्या ओमनी कार चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले. यावेळी केशव महाराज आणि अतुल चव्हाण दोघेही शेतातून पायी जात असताना त्यांना या गाडीने मागून धडक दिली. यात केशव महाराज यांनी आपले प्राण गमावले तर, अतुल हे गंभीर जखमी झाले. त्यांना पुढील उपचारासाठी मालेगाव येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले.

Scroll to Top