होमगार्डच्या मानधनासह भत्त्यांमध्ये दुपटीने वाढ

मुंबई -कायदा व सुव्यवस्था राखण्यात राखण्यात महत्त्वाची भूमिका बजावणार्या होमगार्डच्या बाबतीत सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. होमगार्डचे मानधन वाढविण्यासंदर्भात मागणी अनेक दिवसांपासून केली जात होती. आज दसऱ्याच्या मुहूर्तावर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही मागणी मान्य केली असून मानधनात दुपटीने वाढ केली आहे.

देवेंद्र फडणवीस यांनी एक्स अकाउंटवरवर पोस्ट करून ही माहिती दिली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी म्हटले आहे की, राज्यातील होमगार्ड्सचे मानधन जवळजवळ दुप्पट करण्यासंबंधीचा शासन आदेश जारी करण्यात आला आहे. प्रतिदिन ५७० रुपयांवरून ते आता १०८३ रुपये इतके करण्यात आले आहे. आता हे मानधन देशात सर्वाधिक आहे. याशिवाय विविध भत्त्यांची रक्कम सुद्धा दुप्पट करण्यात आली आहे. उपहार भत्ता १०० वरून २०० रुपये तर भोजन भत्ता १०० वरून २५० रुपये इतका करण्यात आला आहे.
राज्यातील सुमारे ५५,००० होमगार्डना या निर्णयाचा लाभ मिळेल. १ ऑक्टोबर २०१४ पासून ही वाढ देण्यात येईल. गेल्याच महिन्यात सुमारे ११,२०७ होमगार्ड्सची भरती प्रक्रिया सुद्धा पूर्ण करण्यात आली आहे.सद्या त्यांचे प्रशिक्षण सुरू आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top