नवी दिल्ली – टायटॅनिक, अवतार यासारख्या सुपरहिट हॉलिवूड चित्रपटांचे निर्माते जॉन लँडाऊ यांचे कर्करोगाने निधन झाले आहे. वयाच्या ६३ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. जॉन लँडाऊ यांच्या पश्चात त्यांची मुले जेमी आणि जोडी तसेच त्यांची पत्नी ज्युली असा परिवार आहे.
जॉन लँडाऊ यांनी १९८० च्या दशकात प्रॉडक्शन मॅनेजर म्हणून आपल्या करिअरला सुरुवात केली. मेहनतीच्या जोरावर त्यांनी हॉलिवूड फिल्म इंडस्ट्रीत एकामागून एक यश मिळवले. कैनेडियन दिग्दर्शक जेम्स कॅमेरोनचा टायटॅनिक दुर्घटनेवर उच्च बजेट असलेला चित्रपट जॉन लँडाऊ यांनी तयार केला. जेम्स कॅमेरॉन आणि जॉन लँडन यांच्या चित्रपटांना एकूण ११ ऑस्कर पुरस्कार मिळाले आहेत.
जेम्स कॅमेरोन-जॉन लँडाऊ यांच्या जोडीने आतापर्यंत प्रदर्शित केलेल्या महत्त्वाच्या चार चित्रपटांमध्ये तीन चित्रपटांनी सर्वाधिक कमाई केली. ‘टायटॅनिक’ व्यतिरिक्त ‘अवतार’ ‘अवतार – द वे ऑफ वॉटर’ ‘ॲव्हेंजर्स – एंडगेम’ या चित्रपटांनी चांगलीच कमाई केली आहे. जगभरात डॉलर दशलक्षपेक्षा जास्त कमाई करणारा टायटॅनिक हा पहिला चित्रपट होता.