Home / News / हिवाळी अधिवेशनासाठी २० हजार कर्मचारी नागपुरात

हिवाळी अधिवेशनासाठी २० हजार कर्मचारी नागपुरात

नागपूर- विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशनासाठी चार दिवसाचा कालवधी उरला आहे. या अधिवेशनासाठी आजपासून नागपूर विधिमंडळ सचिवालयाचे कामकाज सुरु झाले.प्रशासनाकडून अधिवेशनाची युद्धपातळीवर...

By: E-Paper Navakal

नागपूर- विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशनासाठी चार दिवसाचा कालवधी उरला आहे. या अधिवेशनासाठी आजपासून नागपूर विधिमंडळ सचिवालयाचे कामकाज सुरु झाले.
प्रशासनाकडून अधिवेशनाची युद्धपातळीवर तयारी सुरू आहे. या पार्श्वभूमीवर जवळपास १८ ते २० हजार अधिकारी व कर्मचारी नागपुरमध्ये दाखल होणार आहेत. त्यांच्या निवासाची व्यवस्था निवासी इमारती, शासकीय गेस्ट हाऊस, लॉन व वसतिगृहांमध्ये केली जात आहे. तसेच यामध्ये हिवाळी अधिवेशनासाठी येणारे मंत्री, राज्यमंत्री, व्हीआयपी, आमदार, अधिकारी, कर्मचारी, सुरक्षा अधिकारी, पोलिस कर्मचारी, वाहनचालक आणि अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी निवासाची खास व्यवस्था करण्यात येणार आहे. त्यासाठीचे नियोजन सध्या सुरू आहे.
या अधिवेशनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे वास्तव्य अनुक्रमे रामगिरी, देवगिरी आणि विजयगड बंगल्यावर असणार आहे. विधानसभा अध्यक्ष, उपसभापती, विधान परिषद सभापती, उपसभापती यांचे वास्तव्य रविभवनात असेल. दरम्यान मंत्रिमंडळाचा विस्तार झालेला नाही. रवी भवनमधील २४ बंगले आणि नागभवनमधील १६ बंगले मंत्री व राज्यमंत्र्‍यांना दिले जाणार आहेत.

Web Title:
संबंधित बातम्या

Share:

More Posts