मुंबई – सर्वात मौल्यवान रत्न मानल्या जाणाऱ्या हिऱ्याचे दर सध्या मागील शंभर वर्षांतील नीचांकी पातळीवर आले आहेत. बारचार्ट डायमंड प्राईस इंडेक्स या निर्देशांकावरून हे स्पष्ट झाले आहे.बारचार्ट हा जागतिक अर्थव्यवस्था आणि वायदे बाजारातील मुख्य निर्देशांक मानला जातो. यामध्ये डायमंड प्राईस इंडेक्स हा हिऱ्यांचे दर दर्शविणारा निर्देशांक समाविष्ट आहे. या निर्देशांकानुसार सन २०२२ पासून हिऱ्यांच्या दरात सुरू झालेली घसरण आजतागायत सुरू आहे. आतापर्यंत हिऱ्यांच्या दरांमध्ये ३५ ते ४० टक्क्यांची घसरण झाली आहे. भूराजकीय तणाव, ग्राहकांमध्ये हिरे खरेदीबद्दल दिसणार निरुत्साह अशी काही प्रमुख कारणे या घसरणीमागे आहेत, असे तज्ज्ञ सांगतात.हिऱ्यांच्या दरांमध्ये झालेल्या या घसरणीचा सर्वाधिक फटका गुजरातच्या सुरतमधील हिरे व्यापाराला बसला आहे. अमेरिका आणि चीनसारख्या मोठ्या जागतिक बाजारपेठांकडून कमी मागणी असल्याने सुरतमधील सुमारे ३० टक्के कारखाने बंद झाले आहेत.
हिऱ्याचे दर शतकातील नीचांकी पातळीवर
