कणकवली- कणकवली विधानसभा मतदारसंघातून सलग तिसऱ्यांदा निवडून येताच भाजपाचे नेते नितेश राणे यांनी आज पुन्हा आक्रमक व्यक्त केले. हिंदूत्ववादी सरकार आले आहे.आता भोंगे आम्ही सहन करणार नाही. अनधिकृत मजार आणि हिरव्या चादरी काढून टाका, नाहीतर आम्हाला काढाव्या लागतील, अशा इशारा नितेश राणे यांनी माध्यमांशी बोलताना दिला.
नितेश राणे यांनी पुढे सांगितले की, लोकसभेपासून ठाण्यापासून ते कोकणापर्यंत भाजपा आहे. बालेकिल्ला म्हणजे काय ? कोकणात ठाकरे गटाचा कुत्राही निवडून येत नाही. त्यांचा बालेकिल्ला कसला ? उद्धव ठाकरे लंडनला जाण्याच्या तयारीत आहेत. त्यांनी भांडूपच्या देवानंदला घेऊन जावे. राज्यातील हिंदू समाजाने लव्ह जिहाद विरोधात मतदान केले आहे. याला समर्थन देणाऱ्यांनी निघून जावे. महाराष्ट्राचे सत्ताकेंद्र सागर बंगला आहे. सर्वांचा बॅास सागर बंगल्यावर आहे. हळूहळू काँग्रेसवालेही म्हणतील आमचा बॅास सागर बंगल्यावर बसला आहे, जे उरले आहेत. ते देखील आता सागर बंगल्यावर येतील. वरुण सरदेसाई तरी तिकडे राहतो काय ते पाहावे.