सिमला – हिमाचल प्रदेशात गेल्या दोन दिवसांपासून सुरु असलेल्या मुसळधार पावसाने जनजीवन ठप्प झाले आहे. राज्यातील ११५ प्रमुख मार्ग बंद झाल्याने जागोजागी वाहने अडकून पडली आहेत. २१२ ट्रान्सफॉर्मर बंद झाल्याने वीजपुरवठाही बाधित झाला आहे. त्यातच हवामान खात्याने राज्यात ६ व ७ जुलैला अतीवृष्टीचा इशारा दिला आहे.हिमाचल प्रदेशातील अनेक भागात पावसाचे पाणी साचले असून डोंगराळ भागात मोठ्या प्रमाणात भुस्खलन झाले आहे. मंडी मध्ये १०७, चंबा मध्ये ४, सोलन मध्ये ३ आणि कांगडा जिल्ह्यातील मार्ग बंद करण्यात आले आहेत. चंदीगड – मनाली चौपदरी मार्गावरही पंडोह जवळ रस्त्यावर भेगा पडल्या असून त्यामुळे वाहतूक बंद करण्यात आली आहे. या ठिकाणी युद्धपातळीवर काम सुरु असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. या पावसाचा फटका शेतीलाही बसला आहे.
हिमाचल प्रदेशात पावसाचा कहर जनजीवन ठप्प ! प्रमुख मार्ग बंद
