हिमसरोवरांची होणार तपासणी तज्ज्ञांची पथके अरुणाचलकडे

नवी दिल्ली- अरुणाचल प्रदेशमधील अधिक जोखीम असलेल्या सहा हिमसरोवरांची तपासणी करण्यासाठी प्रथमच तज्ज्ञांची दोन पथके रवाना करण्यात आली आहेत.ही हिमसरोवरे पूर्ण भरून पूर येण्याचा संभाव्य धोका लक्षात घेऊन या पथकांकडून उपाययोजना केल्या जाणार आहेत.

अरुणाचल प्रदेशातील २७ सरोवरांची राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने अधिक जोखीम असलेली सरोवर म्हणून जाहीर केले आहे.यापैकी सहा हिमसरोवरांची तपासणी करण्यात येणार असून राज्यातील तवांग आणि दिबांग खोरे जिल्ह्यातील प्रत्येकी तीन हिमसरोवरांचा यात समावेश आहे.यापैकी दोन हिमसरोवरे समुद्रसपाटीपासून ११ हजार फूट उंचीवर आहेत.

तवांगच्या पथकाचे नेतृत्व कांकी दरांगचे उपायुक्त करत असून मागो परिसरातील हिमसरोवराचा अभ्यास करण्यासाठी हे पथक १९ तारखेलाच रवाना झाले आहे.त्याचप्रमाणे, झांग आणि झेमिथांग या उपविभागांतील आणखी दोन हिमसरोवरांची तपासणीही पथकाकडून केली जाईल.दुसऱ्या पथकाचे नेतृत्व दिबांग खोरे आपत्ती व्यवस्थापन अधिकारी कबांग लेगो करत असून दोन हिमसरोवरांची तपासणी करण्यासाठी ते अनिनी येथे रवाना झाले आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top