हिज्ब उत तहरीरवर बंदी! केंद्रीय गृहमंत्रालयाचा निर्णय

नवी दिल्ली- लेबनॉनसह ३० देशांत कार्यरत असलेली इस्लामिक कट्टरपंथी संघटना हिज्ब उत तहरीरवर केंद्रीय गृहमंत्रालयाने भारतात बंदी घातली. हिज्ब उत तहरीरीला केंद्रीय गृहमंत्रालयाने दहशतवादी संघटना ठरवले आहे.
याबाबत केंद्रीय गृहमंत्रायलाने एक्सवर पोस्ट करुन सांगितले की, “ही संघटना दहशतवादी कारवायांत गुंतलेली आहे. तरुणांना भडकवून दहशतवादी कारवायांतही सहभागी होण्यासाठी प्रेरित करते.” या निर्णयाबाबत केंद्रीय गृहमंत्रालयाने नोटिफिकेशन प्रसिद्ध केले आहे. त्यात म्हटले की, “ही संघटना दहशतवादी कारवायांसाठी निधी गोळा करते. भारतातील लोकशाही पद्धतीने सत्तेत आलेले सरकार उलथून टाकणे आणि खिलापतची स्थापना करणे, असा संघटनेचा हेतू आहे. भारताच्या सुरक्षेसाठी ही संघटना धोकादायक आहे.”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top