हिजबुल्लाह प्रमुख नसरल्लाहांवर २३ फेब्रुवारीला अंत्यसंस्कार

लेबनन – लेबननच्या सशस्त्र दलाचे माजी प्रमुख मयत हसन नसरल्लाह यांची २३ फेब्रुवारी रोजी अंत्ययात्रा काढण्यात येणार असल्याची माहिती हिजबुल्लाहच्या प्रमुखांनी दिली.
हसन नसरल्लाह यांचा २७ सप्टेंबर २०२४ रोजी म्हणजेच ५ महिन्यांपूर्वी बैरुतच्या दक्षिणी उपनगरावर झालेल्या इस्रायली हवाई हल्ल्यात मृत्यू झाला होता. त्यामुळे त्यांच्यावर योग्य पद्धतीने अंत्यसंस्कार करता आले नव्हते. त्यांच्या मृतदेहाचे तात्पुरते दफन करण्यात आले होते. आता नसरल्लाह व हाशेम सफीउद्दीन या दोन्ही नेत्यांवर योग्य अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. २३ फेब्रुवारी रोजी अंत्ययात्रा काढून त्यांना सुपूर्द ए खाक केले जाणार आहे. नसरल्लाह हे ३० वर्षांहूनही अधिक काळ हिजबुल्लाहचे महासचिव होते. त्यांचे उत्तराधिकारी व हिजबुल्लाहचे प्रमुख नईम कासिम यांनी आपल्या संदेशात म्हटले आहे की, जेव्हा त्यांचा मृत्यू झाला तेव्हा परिस्थिती वाईट होती. आता शांतता काळात या दोन्ही नेत्यांवर धार्मिक पद्धतीने अंत्यसंस्कार केले जातील.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top