नाशिक- हिंदू तरुणाला मारहाण केल्या प्रकरणी आज सकाळी नाशिकातील पिंपळगाव पोलीस ठाण्यावर हिंदुत्ववादी संघटनांनी मोर्चा काढून आपला संताप व्यक्त केला.या मोर्चात भाजपाच्या आमदार देवियानी फरांदेदेखील उपस्थित होत्या. तरुणाला मारहाण करणाऱ्या आरोपींना अटक करुन त्यांच्यावर कडक कारवाई करण्याची मागणी या मोर्चेकर्यांनी केली.
सोशल मीडियावर पोस्ट टाकल्याच्या रागातून काही मुस्लीम तरुणांनी एका हिंदू तरुणाला मारहाण केली.या मारहाणीत तो गंभीर जखमी झाला. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेची माहिती मिळताच हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झाल्या. आज सकाळी या संघटनेने पिंपळगावातील बाजारपेठ बंदची हाक देऊन पिंपळगाव पोलीस ठाण्यावर भव्य मोर्चा काढला. या मोर्चात मोठ्या संख्येने लोकांनी सहभाग घेतला.त्यांनी जोरदार घोषणा देऊन पोलीस ठाण्याचा परिसर दणाणून सोडला. याप्रकरणी आरोपींना अटक होत नाही, तोपर्यंत आम्ही मोर्चा मागे घेणार नसल्याचा निर्धार संघटनेचा केल्यामुळे एकच गोंधळ उडाला.