चंदीगड- हिंदी आणि पंजाबी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेते मंगल ढिल्लॉ यांचे आज सकाळी निधन झाले. गेल्या काही वर्षांपासून ते कर्करोगाशी झुंज देत होते. पंजाबमधील लुधियाना शहरातील रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती खालावत चालली होती. आज त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
अभिनेते यशपाल शर्मा यांनी मंगल ढिल्लॉ यांच्या निधनाच्या बातमीला दुजोरा दिला. मंगल यांच्या निधनाने मनोरंजनसृष्टीत शोककळा पसरली आहे. दरम्यान, मंगल ढिल्लॉ यांनी नाटक आणि मालिकांसह अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. ‘खून भरी मांग’, ‘जख्मी महिला’, ‘दयावान’, ‘भ्रष्टाचार’, ‘अकेला’, ‘विश्वात्मा’, ‘अंबा’, ‘अकेला’, ‘जिंदगी एक जुआ’, ‘दलाल’, ‘साहिबान’ यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये त्यांनी काम केले. याशिवाय ‘बुनियाद’, ‘कथा सागर’, ‘जुनून’, ‘मुजरिम हाजिर’, मौलाना आजाद’, ‘परमवीर चक्र’, ‘युग’ आणि ‘नूर जहा’ या त्यांच्या गाजलेल्या मालिका आहेत मंगल यांनी ‘एमडी अँड कंपनी’ नावाचे प्रॉडक्शन हाऊस सुरू केले होते. या बॅनरखाली त्यांनी अनेक पंजाबी सिनेमांची निर्मिती केली होती.
हिंदी आणि पंजाबी अभिनेते मंगल ढिल्लॉ यांचे निधन
