अकोला – अकोला, नांदेड, परभणी, हिंगोली, वाशिममधील काही भागांत आज सकाळी ७.१४ वाजता भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. त्यामुळे नागरिकांत भीतीचे वातावरण परसले होते. या भूकंपाचा केंद्रबिंदू हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी तालुक्यातील रामेश्वर तांडा गावांत होता. या भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर ४.५ नोंदविण्यात आली आहे. या भूकंपामुळे कोणतीही जीवितहानी नाही.
हिंगोली सह ५ जिल्ह्यांत भूकंपाचे सौम्य धक्के
