हिंगोली
राज्यात मराठवाड्यासह विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसाचा जोर वाढला आहे. या अवकाळीमुळे शेती पिकांचे मोठे नुकसान होत असल्याने बळीराजा चिंतेत आहे. हिंगोलीत गेल्या आठ ते दहा दिवसापासून सतत अवकाळी पाऊस आणि गारपीट होत आहे. या पावसाचा भाजीपाला पिकांना जास्त प्रमाणात फटका बसत आहे. यात कारले, वांगे, टोमॅटो, मिरचीसह इतर पिकांचा समावेश आहे.
शेतकऱ्यांच्या हाती आलेली पिके या अवकाळीमुळे खराब होत आहेत. त्यामुळे राज्यातील शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे. भाजीपाला पिकांशिवाय या पावसात फळबागांचेही नुकसान होत आहे. मुसळधार पावसामुळे हिंगोलीतील नहाद गावाच्या शिवारातील भाजीपालावर्णीय पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. हजारो रुपये खर्च करुन उभी केलेली कारल्याची पिके तुटून पडली आहेत. शेतकऱ्यांच्या हाता-तोंडाशी आलेला घास अवकाळी पावसाने हिरावला आहे.