मुंबई – प्रसिद्ध ज्येष्ठ नेत्रतज्ज्ञ व कोरोना नियंत्रण टास्क फोर्सचे सदस्य डॉ. तात्याराव लहाने यांनी आज कोरोनाच्या बाबतीत विशेष माहिती ‘नवाकाळ’ला दिली. त्यांनी म्हटले की, धडधाकट व्यक्तींना आताच्या कोरोना प्रकाराचा त्रास होणार नाही. पण जर व्याधी असतील तर काळजी घ्यायला हवी. हा कोरोना प्रकार धडधाकट व्यक्तीसाठी जीवघेणा नाही. कारण हा विषाणु फुफ्फुसांना हानी पोचवत नाही.
डॉ. लहाने पुढे म्हणाले की, घरी असताना मास्क लावण्याची गरज नाही. मात्र बाहेर फिरताना खबरदारी म्हणून मास्क लावावा. कोरोनाचा हा प्रकार लवकर लुप्त होईल. अर्थात त्याचे रूप बदलू शकते हे लक्षात घ्यायला पाहिजे. आज जो कोरोना विषाणू आहे त्यामुळे ताप, नाकातून पाणी येणे आणि घसा पकडणे ही प्रमुख लक्षणे आहेत. त्यात घसा पकडणे प्रमुख लक्षण आहे. किडनी, हृदयरोग अशा व्याधी आहेत किंवा प्रतिकार शक्ती कमी आहे अशांनी जोखीम न घेता घराबाहेर पडल्यावर मास्क लावावा.
हा कोरोना धोकादायक नाही डॉ. लहानेंची विशेष माहिती
