मुंबई
उद्या रविवारी 16 एप्रिल रोजी पू.डॉ.अप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याहस्ते देण्यात येणार आहे. या कार्यक्रमासाठी विविध मार्गाने खारघर येथे लाखोंच्या संख्येने भाविक येणार आहेत. त्याचवेळी हार्बर रेल्वेवर नियमित देखभालीच्या कामांसाठी मेगाब्लॉक घेण्यात आला होता. मात्र स्वतः सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी मध्य रेल्वेच्या विभागीय व्यवस्थापकांशी चर्चा केल्यानंतर रविवारी 16 एप्रिल रोजीचा हार्बर मार्गावरचा मेगाब्लॉक मध्य रेल्वेने रद्द केला आहे.
आता महाराष्ट्र भूषण कार्यक्रमासाठी येणाऱ्या नागरिकांना हार्बर रेल्वेने व्यवस्थित प्रवास करता येईल. सांस्कृतिक कार्यमंत्री श्री सुधीर मुनगंटीवार यांनी या सहकार्याबद्दल मध्य रेल्वेचे आभार मानले आहेत.