हार्बर मार्गावर २२ दिवसांचा रात्रकालीन मेगाब्लॉक सुरू

मुंबई – मध्य रेल्वेने डेडिकेटेड फ्रेट कॉरिडोरच्या कामासाठी आज सोमवारपासून २ ऑक्टोबरपर्यंत हार्बर मार्गावर २२ दिवसांचा रात्रकालीन ब्लॉक घेतला आहे. यादरम्यान रात्री उशिरा सुटणार्‍या लोकल गाड्यांच्या वेळापत्रकामध्ये बदल करण्यात आला आहे.

मुंबईतील जेएनपीटी ते ग्रेटर नोएडातील दादरीपर्यंत समर्पित मार्गिका उभारण्यात येणार आहे. याच प्रकल्पाचा एक भाग म्हणून पनवेल स्टेशन यार्डमध्ये दोन मार्गिका उभारण्यात येणार आहेत. यासाठी लोकल पार्किंग मार्गिकांमध्ये बदल करण्यात येणार आहे. हे काम करण्यासाठी हा ब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यानुसार नवे वेळापत्रक तयार करण्यात आले आहे. पनवेल यार्डमध्ये रात्री साडेबारा ते पहाटे साडेपाचपर्यंत ब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे हार्बर आणि ट्रान्सहार्बर मार्गावरील रात्री उशिरा धावणाऱ्या आणि पहाटे धावणाऱ्या लोकल फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत.

या मेगाब्लॉकमुळे शेवटची लोकल रात्री १०.५८-
सीएसएमटी-पनवेल, रात्री ११.३२ – ठाणे-पनवेल आणि रात्री १०.१५ पनवेल-ठाणेसाठी सुटेल. त्याचप्रमाणे पहिली लोकल सकाळी ४.३२- सीएसएमटी-पनवेल, सकाळी ५.४० – पनवेल-सीएसएमटी, सकाळी ६.२० – ठाणे-पनवेल,सकाळी ६.१३ – पनवेल-ठाणे यावेळेत धावतील. तर सीएसएमटी-पनवेल – रात्री ११.१४, १२.२४, पहाटे ५.१८,सकाळी ६.४० पनवेल-सीएसएमटी – रात्री ९.५२, १०.५८, पहाटे ४.०३, ५.३१ ठाणे-पनवेल-नेरुळ – रात्री ९.३६, १२.०५, पहाटे ५.१२, ५.४० पनवेल-ठाणे – रात्री ११.१८, पहाटे ४.३३, ४.५३ या लोकल रद्द करण्यात आल्या आहेत. त्याचप्रमाणे अंशत: रद्द केलेल्या गाड्या रात्री ११.३०,११.५२,१२,१३,१२.४० सीएसएमटी-पनवेल लोकल बेलापूरपर्यंत धावतील आणि तेथूनच सीएसएमटीकडे रवाना होतील. रात्री १२.५० ची लोकल वडाळा-बेलापूर लोकल वाशीपर्यंत धावणार आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top