हातकणंगले- गेल्या काही दिवसांपासून शहरातील मुख्य रस्त्यांवर असलेले पथदिवे दिवसाही सुरूच असल्याचे दिसत आहे. यामध्ये नगरपंचायतीचे मोठे आर्थिक नुकसान होत असताना त्याकडे महावितरणचे अधिकारी मात्र कानाडोळा करत असल्याचे नागरिक बोलत आहेत.
इचलकरंजी ते हातकणंगले या मुख्य रस्त्यावरील पथदिवे कायमस्वरूपी सुरू असल्याचे दिसत आहेत. विशेष म्हणजे महावितरणच्या तांत्रिक बिघाडामुळे हा प्रकार सुरू असल्याचा खुलासा वीज वितरण विभागाच्या प्रमुख आसावरी सुतार यांनी केला आहे.डीपीमधील फ्यूज काढूनही हे पथदिवे सुरू असल्याने नागरिकांमध्ये आश्चर्य व्यक्त केले जात आहे.मात्र याचा भुर्दंड नगरपंचायतीला सहन करावा लागणार आहे.मुख्य रस्त्यावरील पथदिवे दिवसा सुरू असताना दुसरीकडे शहरातील कोरवी गल्ली, नेहरू चौक हा परिसर मात्र दोन महिन्यांपासून अंधारात आहे.