हातकणंगले – तालुक्यातील पंचगंगा नदीने गेल्या १५ दिवसांपासुन रौद्ररूप धारण केले होते.या पूर परिस्थितीत इचलकरंजी,चंदूर आणि रुई गावातील शेतकर्यांची तब्बल ४०५ हेक्टर शेतजमीन पाण्याखाली गेल्याने पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.
पंचगंगा नदी गेल्या १५ दिवसांपासून पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे धोक्याच्या पातळीकडे पोहचली आहे. सध्या ही पाणीपातळी स्थिर असली तरी आतापर्यंत शेतजमिनीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.इचलकरंजी,रुई व चंदूर या गावातील सुमारे ४०५ हेक्टर शेतजमीन पाण्यात बुडाली आहे.यात भुईमूग,सोयाबीन,भात आणि खोडवा उसाचे मोठे नुकसान झाले आहे.पुराचे पाणी शेतीत थांबून राहिल्याने ही शेती कुजत आहे.याबाबतच्या तक्रारी आल्यानंतर कृषी विभागाच्या अधिकार्यांनी या शेतजमिनींची पाहणी सुरू केली आहे.वरिष्ठांच्या आदेशानंतर या पूरबाधित शेतीचे पंचनामे केले जाणार असल्याचे कृषी सहाय्यक एस.डी.सुतार यांनी सांगितले.