Home / News / हाँगकाँगमध्ये वयोवृद्ध पांडाने दिला दोन पिल्लांना जन्म

हाँगकाँगमध्ये वयोवृद्ध पांडाने दिला दोन पिल्लांना जन्म

हाँगकाँग- हाँगकाँगमधील ओशन पार्कमध्ये असलेल्या वयोवृद्ध पांडा मादीने दोन पिल्लांना जन्म दिला आहे. दोन पिल्लांना जन्म देणारी सर्वात जास्त वयाची...

By: E-Paper Navakal

हाँगकाँग- हाँगकाँगमधील ओशन पार्कमध्ये असलेल्या वयोवृद्ध पांडा मादीने दोन पिल्लांना जन्म दिला आहे. दोन पिल्लांना जन्म देणारी सर्वात जास्त वयाची ही पांडा माता ठरली आहे. पांडाने एक नर व दुसरे मादी पिल्लांना जन्म दिला आहे.

ओशन पार्कमधील या पिल्लांच्या आगमनाने सारेच सुखावले आहेत.या पार्कमध्ये ही पांडा मादी २०१७ पासून राहत आहे. या पांडाचे मादीचे नाव यिंग यिंग असे आहे. या पांडा मंदीचे वय १९ वर्षे असून तिने तिच्या वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला या दोन पिल्लांना जन्म दिला. पांडा मादीचे वय वाढल्यानंतर गर्भधारणेची शक्यता कमी असते .जितके जास्त वय तितकी गर्भधारणा कमी असते. परंतु,या पांडा मादीने या वयातही दोन पिल्लांना जन्म दिल्याने ओशन पार्कमधील कर्मचारी सुखावले आहेत. दोन पिल्लांपैकी एकाचे वजन १२२ ग्रॅम आहे, तर दुसऱ्या पिल्लाचे वजन ११२ ग्रॅम आहे. सध्या दोन्ही पिल्ले २४ तास इंटेंसिव्ह केअर मध्ये आहेत. पुढील काही महिने ती लोकांसमोर आणली जाणार नाहीत. सध्या त्या दोघांची स्थिती अत्यंत नाजूक आहे .

Web Title:
संबंधित बातम्या