हसन मुश्रीफ यांच्या अटकपूर्व जामिनावर पाच एप्रिलला निकाल

मुंबई : राज्याचे माजी मंत्री, राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफ यांच्या कागल येथील निवासस्थानी ईडीने छापेमारी केली होती. त्यानंतर मुश्रीफांनी अटकपूर्व जामिनासाठी कोर्टात धाव घेतली. आज त्यांच्या अटकपूर्व जामिनावरील सुनावणी पूर्ण झाली असून कोर्टाने निकाल राखून ठेवला आहे.

मुंबई सत्र न्यायालयातील विशेष पीएमएलए कोर्टात या प्रकरणी सुनावणी पूर्ण झाली. अटक टाळण्यासाठी हसन मुश्रीफ यांच्यासह त्यांच्या तीन मुलांनी आणि चार्टर्ड अकाउंटेंटने याचिका दाखल केली होती. कोर्टातील आजची सुनावणी संपलेली असून मुश्रीफांच्या अटकपूर्व जामीन अर्जावर ५ एप्रिलला कोर्ट निर्णय देणार आहे. दरम्यान, मुश्रीफ यांचे व्यावसायिक भागीदार आणि आणि वादग्रस्त ब्रिक्स कंपनीचे सर्वेसेवा चंद्रकांत गाकवाड यांना आता ईडीने चौकशीसाठी ईडीने आज समन्स बजावले.

Scroll to Top