पुणे – राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांचे २४ वर्षांपासून वर्चस्व असलेल्या हवेली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत भाजपच्या पॅनलला बहुमत मिळाले होते. आता या समितीच्या सभापतीपदी राष्ट्रवादी बंडखोर दिलीप काळभोर यांची निवड झाली. तर उपसभापतीपदी भाजपचे रवींद्र कंद यांची निवड झाली. या निवडीमुळे अजित पवारांना मोठा धक्का बसला असल्याची राजकीय चर्चा सुरू झाली आहे. या समितीच्या निवडणुकीसाठी भाजपने राष्ट्रवादी विरुद्ध सर्वपक्षीय पॅनेल तयार केले होते. भाजपच्या पॅनलने १८ पैकी १३ जागांवर विजय मिळवला होता. राष्ट्रवादीच्या पॅनलला केवळ २ जागांवर विजय मिळवता आला. ३ अपक्षांनीही बाजी मारली होती. हवेली बाजार समितीत राष्ट्रवादी बंडखोर दिलीप काळभोर यांची सभापतीपदी, तर उपसभापतीपदी भाजपचे रवींद्र कंद यांची निवड झाल्याने समितीवरील अजित पवारांच्या वर्चस्वाला मोठा धक्का बसला असल्याचे मानले जात आहे.
हवेली कृषी बाजार समितीत अजित पवार यांना मोठा धक्का
