बँकॉक – थायलंडची राजधानी असलेल्या बँकॉक शहरातील हवेची गुणवत्ता घसरली असून त्यामुळे प्रशासनाने शहरातील ३५० शाळा पुढील काही दिवस बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. जागतिक आरोग्य संघटनेच्या सर्वाधिक प्रदुषित शहरांच्या यादीत बँकॉकचा सातवा क्रमांक असून येथील हवेची गुणवत्ता पीएम २.५ अशा धोकादायक स्तरावर घसरली आहे. व्हिएतनाम व कंबोडिया या देशातील अनेक शहरांमधील हवेची गुणवत्ताही घसरली आहे.बँकॉकमधील हवेत कॅन्सरला कारणीभूत ठरणाऱ्या जिवाणूंचे कण मोठ्या प्रमाणात आहेत. यावर प्रशासनाने अनेक उपाय योजले आहेत. हवेतील गारवा त्याचप्रमाणे शेत जाळल्यामुळे निर्माण झालेला धूर, वाहनांमधील धूरामुळे थायलंडमध्ये मोठ्या प्रमाणावर प्रदुषण वाढते. बँकॉकच्या प्रशासनाने शहरातील ३५२ शाळा काही दिवसांसाठी बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. प्रदुषणाला कारणीभूत ठरणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्याचे आदेशही प्रशासनाने दिले आहेत.
हवेची गुणवत्ता घसरली बँकॉकमधील शाळा बंद
