मुंबई-भारतातील तयार खाद्यपदार्थांची विक्री करणाऱ्या आघाडीच्या हल्दीराम स्नॅक्स फूड प्रा.लिमिटेड या कंपनीचा हिस्सा खरेदी करण्यासाठी काही बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये चढाओढ सुरू झाली आहे. पेप्सीको या बहुराष्ट्रीय कंपनीने या संदर्भात हल्दीरामचे मालक अग्रवाल कुटुंबाशी चर्चा सुरू केली आहे.
याआधी हल्दीरामचा हिस्सा खरेदीसाठी टेमासेक आणि अल्फा वेव्ह ग्लोबल, ब्लॅकरॉक आणि ब्लॅकस्टोन या महाकाय जागतिक गुंतवणूक कंपन्यांनी रस दाखविला होता.आता तर न्यूयॉर्क येथे मुख्यालय असलेल्या पेप्सिकोने अग्रवाल कुटुंबाशी थेट चर्चा सुरू केली असून ती प्राथमिक टप्प्यात असल्याचे म्हटले आहे. हल्दीरामचे मूल्यांकन ८५,००० कोटी ते ९०,००० कोटी रुपयांच्या घरात राहण्याचे अनुमान आहे.टेमासेक आणि अल्फा वेव्ह ग्लोबल आधीच हल्दीराममध्ये १० ते १५ टक्के गुंतवणूक आहे. टेमासेककडून कंपनीमध्ये १०० कोटी डॉलरहून अधिक गुंतवणुकीची करण्यास उत्सुक आहे.हल्दीराम कंपनीत नमकीन, मिठाई आणि प्री-मिक्स्ड अन्नपदार्थांसह या नाममुद्रेखाली ५०० हून अधिक प्रकारची उत्पादने बनवली जातात.कंपनीने आर्थिक वर्ष २०२४ मध्ये १२,८०० कोटी रुपयांचा महसूल नोंदवला आहे,जो पेप्सिकोच्या भारतातील तयार खाद्यान्नाच्या जोरावर गाठले आहे .