छत्रपती संभाजीनगर- माजी आमदार हर्षवर्धन जाधव पुन्हा छत्रपती संभाजीनगरमधून लोकसभेच्या रिंगणात उतरणार आहेत. प्रकाश आंबेडकरांनी उमेदवारी दिल्यास वंचित बहुजन आघाडीकडून रिंगणात उतरणार असल्याचे जाधव यांनी सांगितले. गेल्या लोकसभा निवडणुकीत हर्षवर्धन जाधवांना तब्बल २ लाख ८३ हजार ७९८ मते मिळली होती. त्यांच्या उमेदवारीमुळेच चंद्रकांत खैरेंचा पराभव झाला होता. हर्षवर्धन जाधव यांनी पहिला आमदारकीचा राजीनामा मराठा आरक्षणासाठी दिला होता. दरम्यान, छत्रपती संभाजीनगर लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात एमआयएमकडून खासदार इम्तियाज जलील यांना तर महाविकास आघाडीकडून चंद्रकांत खैरे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.