हरियाणात शेतकऱ्यांनी राष्ट्रीय महामार्ग रोखला

चंदीगड – सूर्यफुलाच्या बियाणांना किमान आधारभूत किंमत मिळावी या मागणीसाठी आंदोलक शेतकऱ्यांनी आज रास्ता रोको केला. यावेळी हरियाणाच्या कुरुक्षेत्रात दिल्ली-अमृतसर राष्ट्रीय महामार्ग रोखण्यात आला. परिस्थिती नियंत्रणात आण्यासाठी त्याठिकाणी पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. या आंदोलनामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय झाली होती.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top