न्यूयॅार्क – हत्येच्या प्रकरणात आरोपी महिलेची ४३ वर्षांनंतर अमेरिकेतील एका न्यायालयाने निर्दोष सुटका केली. सँड्रा होम (६४) असे या महिलेचे नाव आहे. १९८० मध्ये मिसूरी लायब्ररीतील कर्मचारी पॅट्रिशिया जेस्के याच्यावर चाकूने वार करून त्याची हत्या केल्याप्रकरणी पोलिसांनी सँड्रा होम हिला अटक केली होती.
होमच्या वकिलाने सांगितले की,पोलिसांनी कोणताही पुरावा नसताना तिला हत्येच्या गुन्ह्यात गोवले. त्यावेळी ती मनोरुग्ण होती. पोलिसांनी तिच्यावर इतका दबाव टाकला की, तिने हत्येचा आरोप स्वीकारला. होम कोणताही गुन्हा न करता ४३ वर्षे तुरुंगात राहिली.
सँड्रा अमेरिकेत चुकीच्या पद्धतीने अटक केल्यानंतर तुरुंगात सर्वात जास्त काळ तुरुंगात राहिलेली महिला बनली आहे. होमच्या खटल्याचा निर्णय १४ जून रोजी देण्यात आला होता, परंतु कागदपत्राच्या विलंब झाल्यामुळे काल तिची सुटका करण्यात आली. त्यानंतर तिने एका उद्यानात आपल्या कुटुंबाची भेट घेतली. यावेळी तिने आपल्या मुलीला मिठी मारली.