हतगड किल्ला प्रवेशद्वाराजवळ कड्याची दरड कोसळली

नाशिक- सुरगाणा तालुक्यातील हतगड किल्ल्याच्या प्रवेशद्वाराजवळच्या कड्याची दरड कोसळल्याची
घटना घडली.सुदैवाने यावेळी याठिकाणी पर्यटक नसल्याने मोठा अनर्थ टळला.मात्र त्यामुळे किल्ल्याचा पायरी मार्ग धोकादायक बनला आहे.

या किल्ल्याच्या कड्यावरून लहानमोठे दगड-गोटे अधूनमधून सतत पडत असतात.त्यातच आता मोठी दरड कोसळल्याने हा पायरी मार्ग अधिकच धोकादायक बनला आहे.त्यामुळे शिवप्रेमी आणि पर्यटकांची सुरक्षा धोक्यात आली आहे. तरी संयुक्त वन व्यवस्थापन समिती हतगड व कनाशी वनपरिक्षेत्र अधिकारी,वन परिमंडळ अधिकारी हतगड आणि वनरक्षक यांनी तातडीने लक्ष घालून खबरदारी म्हणून या किल्ल्यावर जाण्यास पर्यटकांना तात्पुरती बंदी घालावी अशी मागणी स्थानिक नागरिक करीत आहेत.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top