Home / News / स्विगी आयपीओला सेबीची मान्यता! १० हजार कोटींचा निधी उभारणार

स्विगी आयपीओला सेबीची मान्यता! १० हजार कोटींचा निधी उभारणार

नवी दिल्ली- घरोघरी खाद्यपदार्थांचा पुरवठा करणाऱ्या स्विगी कंपनीच्या आयपीओ म्हणजेच प्रारंभिक समभाग विक्रीला भांडवली बाजार नियामक सेबीने मान्यता दिली आहे....

By: E-Paper Navakal

नवी दिल्ली- घरोघरी खाद्यपदार्थांचा पुरवठा करणाऱ्या स्विगी कंपनीच्या आयपीओ म्हणजेच प्रारंभिक समभाग विक्रीला भांडवली बाजार नियामक सेबीने मान्यता दिली आहे. त्यामुळे आता स्विगी आयपीओद्वारे १० हजार कोटींचा निधी उभारणार आहे.

स्विगीच्या आयपीओच्या संदर्भातील तपशील अद्याप गोपनीय ठेवण्यात आले आहेत.सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार,एप्रिलमध्ये, स्विगीने नवीन समभाग आणि ओएफएसच्या माध्यमातून १०,४१४ कोटी निधी उभारण्यासाठी भागधारकांची मंजुरी मिळवली होती. विद्यमान वर्षात २३ एप्रिल रोजी स्विगीच्या सर्वसाधारण सभेत यासंदर्भात विशेष ठराव मंजूर करण्यात आला.बंगळुरुच्या कंपनी प्रवर्तकांकडील सुमारे ६,६६४ कोटी रुपये मूल्याचे समभाग आणि ३,७५० कोटी रुपयांच्या नवीन समभागांची विक्री करण्याची शक्यता आहे. ही कंपनी २०१४ मध्ये स्थापन झाली असून एप्रिलमध्ये कंपनीचे मूल्य साधारणपणे १३४ अब्ज अमेरिकन डॉलर इतके होते.

Web Title:
संबंधित बातम्या