पुणे- शहरातील स्वारगेट एसटी बस स्थानकावर पहिल्यांदाच महिला सुरक्षारक्षकांची नियुक्ती केली आहे. याशिवाय तक्रार निवारण कक्षदेखील स्थापन केला आहे. त्याचप्रमाणे स्थानकाचे सुरक्षा लेखापरीक्षण झाल्यावर सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची संख्या वाढविण्यात येणार आहे, अशी माहिती एसटी महामंडळाचे पुणे विभाग नियंत्रक प्रमोद नेहूल यांनी दिली.
अत्याचाराच्या घटनेनंतर स्वारगेट बस स्थानकातील सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. स्थानकात अपुरी सुरक्षा व्यवस्था, अपुरे आणि चुकीच्या ठिकाणी लावलेले सीसीटीव्ही कॅमेरे यावर चौफेर टीका झाल्यानंतर एसटी प्रशासनाने काही महत्त्वपूर्ण निर्णय घेतले. त्यात कॅमेऱ्यांची संख्या वाढविणे, महिला सुरक्षारक्षकांची नियुक्ती करणे, तक्रार निवारण कक्ष स्थापन करणे आदी बाबींचा समावेश आहे. बस स्थानकावर पूर्वी २३ सुरक्षारक्षक होते. त्यात वाढ करून आता ३६ सुरक्षारक्षक नियुक्त केले. त्यात चार महिलांचा समावेश आहे. दोन शिफ्टमध्ये प्रत्येकी दोन महिला काम करतील. परिणामी, स्थानकाच्या आवारात त्यांना लक्ष देणे सोपे होईल.
स्वारगेट बसस्थानकावर आता महिला सुरक्षारक्षक
