स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या अपमानवरून! राहुल गांधींच्या विरोधात जोडे मारो आंदोलन..

मुंबई- विधिमंडळाच्या पायऱ्यांवर विरोधक आणि सत्ताधारी आमने-सामने आले. स्वातंत्र्यवीर सावकर व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात केलेल्या वक्तव्यावरुन सत्ताधारी आमदारांनी राहुल गांधींचा निषेध केला. भाजप व शिंदे गटाच्या आमदारांनी विधिमंडळाच्या पायऱ्यांवर राहुल गांधींविरोधात घोषणाबाजी केली. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयी अवमानकारक वक्तव्य करणाऱ्या राहुल गांधींचा निषेध करीत गुरुवारी सत्ताधारी आमदारांनी त्यांना जोडे मारले. तसेच विधानभवनाच्या पायऱ्यांवर राहुल गांधींविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.

दरम्यान सभागृहाचे कामकाज सुरु होताच प्रश्नोत्तराच्या तासानंतर सत्ताधारी भाजपा आणि शिवसेना (शिंदे गट )पुन्हा एकदा आक्रमक झाले.. राहुल गांधी यांच्या निषेधाचा ठराव सभागृहाने करावा ही मागणी सत्ता धाऱ्यांनी लाऊन धरली… त्यामुळे झालेल्या गदारोळात सभागृहाचे कामकाज आधी 10मिनटे आणि मग 1/2तास तहकूब करावे लागले.. पुन्हा सभागृह सुरु होताच सत्ताधाऱ्यां्यांनी गोंधळ घालण्यास सुरुवात केली.. या वेळी विरोधी पक्षनेते अजित दादा पवार यांनी अशा रीतीने विधिमंडळ परिसरात कुठल्याही पक्षाच्या नेत्याबद्दल असे जोडे मारो आंदोलन चुकीचे असल्याचे सांगितले तेव्हा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अश्या प्रकारचे आंदोलन चुकीचेच असल्याचे सांगितले मात्र स्वातंत्रवीर सावरकर यांच्या बद्द्लही अपमानजानक वक्तव्य केले जाऊ नये असे मत व्यक्त केले.. त्यावेळी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनीही या प्रकारबद्दल नापसंती व्यक्त केले.. आपण रेकॉर्ड तपासून घेऊ आणि या पुढे अश्या प्रकारची आंदोलन केली गेल्यास कडक कारवाई केली जाईल असा इशारा ही नार्वेकर यांनी दिला.

Scroll to Top