स्थलांतरितांना स्वीकारण्यास मेक्सिकोचा नकार! कोलंबियाची माघार

वॉशिंग्टन- अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदी नुकतेच पुन्हा विराजमान झालेले डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेत बेकायदा राहणाऱ्या निर्वासितांना परत पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. ट्रम्प यांच्या या धोरणाला काही देशांनी विरोध केला आहे. कोलंबिया आणि मेक्सिको या दोन देशांनी अमेरिकेहून आपल्या देशातील स्थलांतरितांना परत घेऊन येणारी विमाने मायदेशात उतरवण्यास थेट नकार दिला. यामुळे फार बिकट प्रसंग निर्माण झाला आहे. अमेरिका स्थलांतरितांना हाकलणार आणि स्थलांतरितांचे मूळ देश त्यांना स्वीकारणार नाहीत असे गंभीर प्रसंग यापुढेही घडतील.
अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदी नुकतेच पुन्हा विराजमान झालेले डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेत बेकायदा राहणाऱ्या निर्वासितांना परत पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. ट्रम्प यांच्या या धोरणाला काही देशांनी विरोध केला आहे. कोलंबिया आणि मेक्सिको या दोन देशांनी अमेरिकेहून आपल्या देशातील स्थलांतरितांना परत घेऊन येणारी विमाने मायदेशात उतरवण्यास थेट नकार दिला. यामुळे फार बिकट प्रसंग निर्माण झाला आहे. अमेरिका स्थलांतरितांना हाकलणार आणि स्थलांतरितांचे मूळ देश त्यांना स्वीकारणार नाहीत असे गंभीर प्रसंग यापुढेही घडतील.
कोलंबियाने आपल्या देशातील स्थलांतरितांना परत घेऊन येणाऱ्या अमेरिकेच्या विमानांना उतरू दिले नाही. त्यानंतर अमेरिकेने कोलंबियाहून आयात होणाऱ्या तेल, कॉफी, फुले या वस्तूंवर निर्बंध लावण्याची आणि आयात शुल्क वाढवण्याची धमकी दिल्यानंतर कोलंबियाने माघार घेतली आणि विमाने उतरवू दिली. मात्र भविष्यात यावरून दक्षिण अमेरिकेतील देशांबरोबर अमेरिकेचे एकप्रकारचे शीतयुद्ध होण्याची शक्यता आहे.
डोनाल्ड ट्रम्प यांनी राष्ट्राध्यक्षपदावर पुन्हा येताच पहिलीच पान 1 वरून
घोषणा अमेरिकेत बेकायदा राहणाऱ्या स्थलांतरितांना देशातून हाकलून देण्याची केली होती. या घोषणेचा फटका जगभरातील अनेक देशांना बसणार आहे. ट्रम्प यांच्या योजनेनुसार या नागरिकांना अमेरिकन विमानांतून त्यांच्या देशात नेऊन सोडले जाणार आहे. त्यानुसार अमेरिकेच्या दोन लष्करी विमानांनी शुक्रवारी एकूण 160 स्थलांतरितांना घेऊन ग्वाटेमालाला उड्डाणे केली. त्यानंतर एक सी-17 विमान मेक्सिकोमध्ये उतरवण्याचे नियोजित होते. परंतु मेक्सिकोने परवानगी नाकारल्यामुळे हे विमान स्थलातरीतांना घेऊन तिथे जाऊ शकले नाही. मेक्सिकोने विमानाला परवानगी नाकारण्याचे कारण सांगितलेले नाही. परंतु निर्वासितांना परत पाठवण्याआधी अमेरिकेने आपली संमती घ्यावी, असे म्हटले आहे. विशेष म्हणजे ट्रम्प पुन्हा राष्ट्राध्यक्ष बनल्यापासूनच मेक्सिको आणि अमेरिकेचे संबंध यावरूनच बिघडले आहेत. ट्रम्प यांनी गल्फ ऑफ मेक्सिकोचे गल्फ ऑफ अमेरिका असे नामांतर करण्याची घोषणा केली आहे. त्यात निर्वासितांच्या परत पाठवणीसाठी ‘रिमेन इन मेक्सिको’ ही योजना जाहीर केल्याने या संबंधात आणखी वितुष्ट आले आहे.
दक्षिण अमेरिकेतील आणखी एक देश कोलंबियानेही बेकायदेशीर स्थलांतरीतांना घेऊन जाणाऱ्या दोन अमेरिकन लष्करी विमानांना देशात उतरण्यास परवानगी दिली नव्हती. त्यानंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कोलंबियावर 25 टक्के शुल्क आणि निर्बंध लादण्याची घोषणा केली होती. पुढील आठवड्यापासून हे शुल्क 50 टक्के करण्याची धमकी दिली. कोलंबियन अधिकाऱ्यांवर प्रवास बंदी, व्हिसा रद्द आणि आर्थिक निर्बंधही जाहीर केले. त्यानंतर अमेरिकेला प्रत्युत्तर म्हणून, कोलंबियाचे अध्यक्ष गुस्तावो पेट्रो यांनी ट्रम्प यांनी कोलंबियाचे राष्ट्राध्यक्ष गुस्तावो पेत्रो यांनी अमेरिकन वस्तूंवर 50 टक्के आयात शुल्क लावण्याची धमकी दिली आणि नंतर आपल्या व्यापार मंत्र्यांना 25 टक्के शुल्क वाढवण्याचे निर्देश दिले. त्यामुळे दोन्ही देशांत तणाव निर्माण झाला होता. मात्र नंतर कोलंबियाने आज आपल्या निर्णयापासून माघार घेतली. राष्ट्राध्यक्ष पेट्रो यांनी निर्वासित कोलंबियन नागरिकांच्या सन्माननीय परतीसाठी मध्य अमेरिकन देश होंडुरासला विमान पाठवण्याचा निर्णय घेतला.
कोलंबिया दक्षिण अमेरिकेतील अमेरिकेचा तिसरा सर्वात मोठा व्यापार भागीदार आहे. कोलंबिया दररोज 2 लाख बॅरल कच्चे तेल अमेरिकेला पाठवतो. अमेरिका कोलंबियातून कोळसा, कॉफी आणि सोनेदेखील आयात करते. कोलंबिया हा अमेरिकेचा ताज्या फुलांचा सर्वात मोठा पुरवठादार आहे. या अमेरिकन निर्णयाचा परिणाम या सर्व वस्तूंच्या किमतीवर होऊ शकला असता.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top