प्रयागराज – अपल कंपनीचे प्रमुख दिवंगत स्टिव्ह जॉब्स यांची पत्नी लॉरेन पॉवेल या महाकुंभात सहभागी होणार असून त्यांना कमला हे हिंदू नाव दिले असल्याची माहिती निरंजनी आखाड्याचे अध्यात्मिक गुरु स्वामी कैलासानंद महाराज यांनी दिली आहे.स्वामी कैलासानंद म्हणाले की, लॉरेन पॉवेल या माझ्या शिष्य असून त्या मला भेटायला महाकुंभामध्ये येत आहेत. ती मला मुलीसारखी आहे. त्यामुळे मी तिला माझे गोत्रही दिले असून कमला हे हिंदू नाव दिले आहे. ती दुसऱ्यांदा भारतात येत असून ती इथे १७ दिवस राहणार आहे. ती कल्पवासमध्ये साधुंबरोबर राहणार असून कथा व प्रवचनात सहभागी होणार आहे. त्यांचे पती दिवंगत स्टीव जॉब्स यांनाही हिंदू व बौद्ध धर्मांविषयी आस्था होती. लॉरेन कथा प्रवचनातही सहभागी होणार आहेत.लॉरेल पॉवेल आज प्रयागराजला येण्याची शक्यताही व्यक्त करण्यात आली. त्यांची राहण्याची व्यवस्था महाराजा डिलक्स कॉटेजमध्ये करण्यात आली असून त्या २९ जानेवारीपर्यंत प्रयागराजला राहणार आहेत. १९ जानेवारीला सुरु होणाऱ्या प्रवचनात त्या यजमानपद भूषवणार आहेत. सनातन हिंदू धर्म समजून घेण्याचा त्या प्रयत्न करणार आहेत.
स्टिव्ह जॉब्सच्या पत्नी महाकुंभात कमला नावाने सहभागी होणार
