सोलापूर- कोजागिरी पोर्णिमा आणि मंदीर पोर्णिमेनिमित्त सोलापूर तुळजापूर मार्ग उद्या रात्रीपासून ४ दिवस बंद राहणार आहे. या मार्गावरील वाहतूक पर्यायी मार्ग वळवण्यात येणार आहे.
१६ ऑक्टोबरला कोजागिरी पोर्णिमा आणि मंदीर पौर्णिमेनिमित्त तुळजाभवानी देवीच्या दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात भाविक सोलापूरहून तुळजापूरकडे पायी जात असतात. या मार्गावर वाहनांमुळे तुळजापूरला जाणाऱ्या भाविकांना अडथळा, गैरसोय आणि अपघात होऊन कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता असते. त्यामुळे १४ ऑक्टोबर रोजी रात्री १२ वाजेपासून ते १७ ऑक्टोबर रोजी रात्री १२ वाजेपर्यंत या मार्गावर सर्व प्रकारच्या वाहनांना वाहतुकीस बंदी घालण्यात आली आहे.