सोलापूर – शहरातील होम मैदानावर सिद्धेश्वर कृषी प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. या कृषी प्रदर्शनामध्ये वेगवेगळे प्राणी-पक्षी आले आहेत. एकीकडे बुटकी राधा म्हैस लोकांना आकर्षित करत आहे, तर दुसरीकडे चक्क दूध पिणारा कोंबडाही कुतुहलाचा विषय बनला आहे.
‘राजा’ असे या दूध पिणाऱ्या कोंबड्याचे नाव असून तो वनराज क्रॉस जातीचा हा कोंबडा आहे. ज्या पद्धतीने एखाद्या पैलवानला खुराक दिली जातो, अगदी तशाच पद्धतीचा या कोंबड्याचा खुराक आहे.हा कोंबडा दररोज सकाळी मका भरडा आणि भुसा खातो, तर दुपारी तांदूळ, गहू, बाजरी खातो. रात्रीच्या वेळेस भुसा तसेच १०० मिली दूध पितो. या कोंबड्याचे तब्बल ६ किलो वजन असून तो १२ महिन्यांचा आहे.