सोलापूर:
महाराष्ट्रातील सर्वाधिक तापमान असणाऱ्या जिल्ह्यांत सोलापूरचा समावेश होतो. यंदाही सोलापूरचा पारा ४३ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचला आहे. सोलापूरचा पारा ४३ पार गेला असल्याने नागरिक हैराण झाले आहेत. एप्रिल महिन्यात ४० अंशापर्यंत पोहोचले होते. मात्र मे महिन्याच्या सुरूवातीपासून तापमानाचा पारा ४० अंशाच्या पुढे पुढे नोंदले गेले आहे. वाढत्या उन्हामुळे उकाडा वाढल्याने सोलापूरकर चांगलेच तापले आहे. या महिन्यात सोलापूरचे तापमान दुसऱ्यांदा ४३ अंशावर पोहोचले आहे.त्यामुळे नागरिकांनी घराबाहेर पडण्यापूर्वी योग्य ती काळजी घ्यावी असे प्रशासनाने सांगितले आहे.सोलापुरात सकाळी ९ वाजल्यापासूनच उन्हाचा पारा वाढल्याने अनेकांना उष्माघातासारख्या आजारांना सामोरे जावे लागत आहे.