सोलापूर:
सोलापुरातील प्रसिद्ध श्रीमंत मानाचा कसबा गणपती प्रतिष्ठानच्यावतीने दरवर्षी अंबा महोत्सव साजरा करण्यात येतो. यंदाच्या वर्षी आंबा महोत्सवाचे चौथे वर्ष असून भक्तांकडून लाडक्या गणराया चरणी आंबा वाहण्यात आला. यंदाच्या आंबा महोत्सवात 125 डझन देवगड हापूस आंब्याची आरास करण्यात आली होती. नेत्रपदी आंब्याची आरास पाहण्यासाठी आणि बाप्पाचे दर्शन घेण्यासाठी भक्तगणांची मोठी गर्दी केली होती.
साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त असणाऱ्या अक्षय तृतीयेला या आंबा महोत्सवाची सांगता करण्यात येणार आहे. यावेळी गोरगरीब कष्टकरी कामगार यांना हा देवगड हापूस आंबा प्रसाद म्हणून देण्यात येणार आहे.पंढरपुरातही श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिर समितीच्या वतीने प्रत्येक सण-उत्सवाला मंदिराच्या गाभाऱ्यात मनमोहक अशी फुलांची आरास करण्यात येत असते. त्याचप्रमाणे यंदा अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर सोलापूर येथील कसबा गणपीतीला आंब्यांची आरास करण्यात आली आहे.