Home / News / सोलापुरात टेम्पो-कार धडकचौघांचा मृत्यू ! तीन गंभीर

सोलापुरात टेम्पो-कार धडकचौघांचा मृत्यू ! तीन गंभीर

सोलापुरात – टेम्पो-कार धडकचौघांचा मृत्यू ! तीन गंभीरसोलापूरसोलापुरातील नातेपुते-फलटण महामार्गावरील कारूंडे पुलाजवळ आज सकाळी टेम्पो आणि कार यांच्यात भीषण धडक...

By: E-Paper Navakal
Social + WhatsApp CTA

सोलापुरात – टेम्पो-कार धडकचौघांचा मृत्यू ! तीन गंभीरसोलापूरसोलापुरातील नातेपुते-फलटण महामार्गावरील कारूंडे पुलाजवळ आज सकाळी टेम्पो आणि कार यांच्यात भीषण धडक झाली. त्यात चार जणांचा मृत्यू झाला, तर तीन जण गंभीर जखमी झाले.राजेश शहा (५४, कार चालक), दुर्गेश शंकर घोरपडे (२७ ) कोमल विशाल काळे (३२), शिवराज काळे (१०) अशी मृत व्यक्तींची नावे आहेत. राजेश शहा व इतर सहाजण कारमधून प्रवास करत नातेपुते मार्गे फलटणच्या दिशेने कास पठार येथे पर्यटनासाठी जात होते. अपघातानंतर टेम्पो चालक फरार झाला. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले. जमखींना नातेपुते ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. राजेश शहा, दुर्गेश घोरपडे, कोमल काळे, विशाल काळे यांना डोक्यातून रक्तस्त्राव झाल्यामुळे उपचारापूर्वीच मृत झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी घोषित केले.

Web Title:
संबंधित बातम्या