सोन्याच्या दर कडाडले! सर्व उच्चांक मोडले

जळगाव :- सोन्याच्या दरात सातत्याने वाढ होत आहे. ऐन लगीन सराईच्या मुहूर्तावर सोन्याच्या दरात दिवसागणिक मोठी वाढ होत असल्याने सोने खरेदी करू पाहणाऱ्या ग्राहकांचे बजेट बिघडणार अशी चिन्ह आहेत. जळगावात सोन्याच्या किंमतींने ६२ हजारांवर उसळी घेतली आहे.

जागतिक पातळीवर सोन्याच्या मागणीत वाढ झाल्याने सोन्याचा दर उच्चांकी पातळीवर गेला आहे. आजपर्यंतचे सर्व उच्चांक मोडीत काढले आहे. जागतिक पातळीवर अनेक बँका तोट्यात गेल्यानंतर गुंतवणूकदारांनी बँकामधील पैसे काढून सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोन्याच्या मध्ये गुंतवणूक करण्यास सुरुवात केली. त्यामुळे सोन्याच्या मागणीत वाढ झाली आणि परिणामी सोन्याच्या दरात वाढ झाली आहे.

Scroll to Top