Home / News / सोनम वांगचुक यांना जंतरमंतरवर उपोषण करण्यास परवानगी नाही

सोनम वांगचुक यांना जंतरमंतरवर उपोषण करण्यास परवानगी नाही

नवी दिल्ली – लडाखचे सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक आणि त्यांच्या सहकाऱ्यांना दिल्ली पोलिसांनी जंतरमंतरवर उपोषण करण्यास परवानगी दिली नाही. सोनम...

By: E-Paper Navakal

नवी दिल्ली – लडाखचे सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक आणि त्यांच्या सहकाऱ्यांना दिल्ली पोलिसांनी जंतरमंतरवर उपोषण करण्यास परवानगी दिली नाही. सोनम वांगचुक एक्सवर पोस्ट केली की, आणखी एक नकार, आणखी एक निराशा. शेवटी आज सकाळी आम्हाला जंतरमंतरवर उपोषण कऱण्यास नकार मिळाला.सोनम वांगचुक पुढे म्हणाले की, आम्हाला औपचारिक ठिकाणी शांततेत उपोषण करायचे होते. मात्र दोन-तीन दिवसांपासून आंदोलनासाठी एकही जागा आम्हाला देण्यात आलेली नाही. आम्हाला लडाख भवनात ताब्यात घेण्यात आले आहे. आमचे शेकडो लोक लेहहून दिल्लीत आले आहेत. यामध्ये महिला, माजी सैनिक आणि ७५ वर्षांवरील लोकांचा समावेश आहे. आता लडाख भवनातच आम्ही सर्वजण बेमुदत उपोषणाला बसणार आहोत.

Web Title:
संबंधित बातम्या