सैनी समाजाचे राजस्थानात आरक्षणासाठी पुन्हा आंदोलन

जयपूर- राजस्थानच्या पूर्व भागात १८० मतदारसंघात प्रभाव चाकण्याची क्षमता असलेल्या सैनी समाजाने पुन्हा आरक्षणासाठी आंदोलनांचे हत्यार उगारले आहे.
सैनी समाजाला त्यांच्या लोकसंख्येनुसार १२ टक्के आरक्षण हवे आहे . त्यासाठी ते सतत आंदोलन करीत आहेत . आता त्यांनी राष्ट्रीय महामार्ग ८ जाम करण्याचा इशारा दिला आहे . राजस्थानात ओबीसी मध्ये सैनी समाजासह मीना , गुज्जर , यादव , कुशवाह , रजपूत यांचेही आरक्षणासाठी लढे सुरू असतात . पूर्व राजस्थानात त्यांचा प्रभाव मोठा आहे . यामुळे नेते आणि पक्ष त्यांच्या पाठीशी असतात . लोकसभा निवडणूक जवळ आल्याने त्यांच्या आंदोलनाची तीव्रता वाढण्याची शक्यता आहे . आपल्या मागण्या मान्य करण्यासाठी हीच योग्य वेळ असल्याचे त्यांचे मत आहे . सैनी समाज आता आरक्षण आंदोलन तीव्र करण्याच्या तयारीत आहे .

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top