सेल्फी काढताना सोमेश्वर धबधब्यात पडून युवतीचा मृत्यू

नाशिक : नाशिक शहरातील सोमेश्वर धबधब्याजवळ सेल्फी काढण्यासाठी उभ्या असलेल्या युवतीचा धबधब्यात पडून मृत्यू झाला. यात तिच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने तिचा मृत्यू झाला आहे.

धोकादायक पर्यटनस्थळी गेल्यानंतर काळजी घेण्याच्या सूचना पोलीस नेहमीच करत असतात, मात्र या सूचनांकडे पर्यटक दुर्लक्ष करून आपला जीव धोक्यात घालतात.असाच प्रकार येथे घडला. सिन्नर येथील काही मित्रांचा ग्रुप हा नाशिक शहरात फिरण्यासाठी आला होता. यावेळी दोन तरुण आणि एक तरुणी असा तीन मित्रांचा ग्रुप सोमेश्वर धबधब्याजवळ पर्यटनासाठी आले होते. नाशिक शहरातील सोमेश्वर धबधबा येथे मित्रांसमवेत फिरण्यासाठी आलेली ही युवती फोटो काढत असताना तिचा पाय घसरून ती नदीपात्रात पडल्यावर मृत्यू झाला आहे. शिवांगी जयशंकर सिंह असे मृत पावलेल्या मुलीचे नाव आहे. शिवांगी आणि तिचा मित्र आदित्य देवरे हे सोमेश्वर धबधबा येथे फिरण्यासाठी आले होते. त्यामुळे सोमेश्वर धबधब्याचे शुभांगी मित्रांसोबत फोटो काढत असताना तिचा पाय घसरला आणि ती तोल जाऊन गोदावरी नदीपात्रात पडली. यावेळी तिथे उपस्थित नागरिकांनी तिला नदीपात्रातून बाहेर काढून उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तिला मृत घोषित केले. या प्रकरणी गंगापूर पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Scroll to Top