न्यूयॉर्क – अमेरिकेत ५ नोव्हेंबरला होणाऱ्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प आणि डेमोक्रॅटिक पक्षाच्या उमेदवार कमला हॅरिस यांचे मतदारांना आपल्या बाजूने करण्याचे सर्वतोपरी प्रयत्न सुरु आहेत. त्यात कमला हॅरिस यांच्यासाठी टीव्ही अभिनेत्री ओप्रा विन्फ्रे, लिओनार्डो डिकॅप्रियो आणि बियॉन्से यांनी प्रचार केला,.
दुसरीकडे जेसन एल्डियन, ली ग्रीनवूड, एलोन मस्क, किड रॉक आणि रोझेन बार यासारखे सेलिब्रिटींनी ट्रम्प यांना साथ दिली आहे. सर्व सेलिब्रिटींनी प्रचारात सहभाग घेतली असून ऑस्कर विजेता अभिनेता लिओनार्डो डिकॅप्रिओनेही कमलांना पाठिंबा देऊन सोशल मीडियावर एक व्हिडिओ पोस्ट केला. अध्यक्षपदासाठी कमला हॅरिस यांना मतदान करणार असल्याचे त्यांनी व्हिडिओमध्ये म्हटले. या व्हिडिओमध्ये डिकॅप्रिओ म्हणाला, “देशाची अर्थव्यवस्था उद्ध्वस्त होत आहे. म्हणूनच मी कमला हॅरिसला मतदान करत आहे.”

								
								
								
								
								
				
															
								
								
								
								
								
								







