सेन्सेक्स उसळीसह बंद ४९८.५८ अंकांची वाढ

मुंबई – गेल्या आठवड्यात झालेल्या प्रचंड घसरणीनंतर आज शेअर बाजाराने आठवड्याची सुरुवात तेजीसह केली.शेअर बाजाराचा सेन्सेक्स ४९८.५८ अंकांनी वधारून ७८,५४०.१७ अंकांवर बंद झाला. निफ्टी १६५.९५ अंकांनी वधारून २३,७५३.४५ वर बंद झाला.आज निफ्टीत जेएसडब्ल्यू स्टील, आयटीसी, हिंडाल्को इंडस्ट्रीज, इंडसइंड बँक आणि ट्रेंटचे शेअर्स सर्वाधिक वधारले. हीरो मोटोकॉर्प, मारुती सुझुकी, नेस्ले इंडिया, एचसीएल टेक्नॉलॉजीज, बजाज फिनसर्व्ह यांचे शेअर्स सर्वाधिक घसरले. एफएमसीजी, मेटल, ऑईल अँड गॅस, एनर्जी, रियल्टी निर्देशांक ०.५ ते १ टक्क्यांनी वधारले, तर मीडिया निर्देशांक ०.४ टक्क्यांनी घसरले. बीएसई मिडकॅप निर्देशांक किरकोळ वधारला, तर स्मॉलकॅप निर्देशांक ०.६ टक्क्यांनी घसरला. बीएसईमध्ये सूचीबद्ध कंपन्यांचे एकूण बाजार भांडवल मागील सत्रातील ४४१ लाख कोटी रुपयांवरून ४४४ लाख कोटी रुपयांवर पोहोचले असून एकाच सत्रात गुंतवणूकदारांच्या संपत्तीत तीन लाख कोटी रुपयांची वाढ झाली आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top