चेन्नई – सॅमसंग इंडिया लिमिटेडमधील गेल्या महिन्याभरापासून सुरु असलेला संप अखेर मागे घेण्याचा निर्णय कामगारांनी घेतला आहे. कामगार कामावर रुजू होणार असल्याचे तामिळनाडू सरकारने प्रसिद्धीला दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की, वेतनवाढ, काम करण्यासाठी सुयोग्य वातावरण व सिटु प्रणित सॅमसंग इंडिया कामगार युनियनला मान्यता द्यावी या मागण्यांसाठी कारखान्यातील १ हजार ७५० कामगारांपैकी ११०० कामगार संपावर होते. ९ सप्टेंबर पासून बेमुदत संपावर असलेल्या या कामगारांनी अखेर महिन्याभरानंतर कामावर परतण्याचा निर्णय घेतला आहे.